संविधान की समांतर हुकूमशाही? आप्पारावपेठचे ‘वाळीत’ प्रकरण लोकशाहीसाठी धोक्याची घंटा!
======= उपसंपादक : सतीश वागरे ======== भारतीय स्वातंत्र्याची ८० वर्षे साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना आणि प्रजासत्ताक भारताच्या संविधानाला सात दशके उलटून गेलेली असताना, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथून समोर आलेले वास्तव हे सुन्न करणारे आहे. रेड्डी समाजातील भास्कर गड्डम आणि विनोद गड्डम या दोन कुटुंबांना जातपंचायतीने ज्या क्रूरपणे ‘वाळीत’ टाकले आहे, ते पाहता आपण…