मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री संतोष बांगर, आशिष जयस्वाल आदी मान्यवरांनीही या दोघांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top