दि.२१ संजय भोकरे, मुंबई प्रतिनिधी;
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलिसांना निवडणूक बंदोबस्ताची ड्युटी असणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस अंमलदारांना व अधिकारी यांना १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या मिळणार नाहीत.
सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहे. ह्या संबधीचे आदेश पोलिस महासंचालकाने असे आदेश काढले आहेत. राज्यातील २८८ मतदार संघात २० नोव्हेंबर ला मतदान होणार आहे व २२ ऑकटोंबर् पासून निवडणुकीचा फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे.

त्यासाठी सुद्धा पोलिस बंदोबस्त असणार आहे. ह्या दरम्यान ५ ते १८ नोव्हेंबर च्या काळात उमेदवारांच्या प्रचार बैठका,सभा, होतील. २३ नोव्हेंबर ला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. निकाल शांततेत पार पडावा ह्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. तसेंच पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, राज्य राखीव दलाचे कर्मचारी असणार आहेत.
