नांदेडमध्ये राजकीय बॅनरफाड प्रकरण; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून दिरंगाई: युवक काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी
दि. २४, नांदेड :छत्रपती शिवाजीनगर परिसरात राजकीय तापमान चढवणारी घटना २२ नोव्हेंबरच्या रात्री घडली आहे. रात्री सुमारे ११:३० वाजता फुले मार्केटजवळील आर. एस. ब्रदर्स दुकानाशेजारी लावलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर विधानसभा अध्यक्ष रोहन कांबळे यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा बॅनर एका अनोळखी व्यक्तीकडून फाडण्यात आला. या कृतीमुळे सुमारे ₹३,५००/- चे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बॅनरफाड…