माहुर तालुक्याच्या पक्ष निरीक्षकपदी इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांची नियुक्ती
दि. ४ नांदेड (प्रतिनिधी) –आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी नियुक्त्या सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने माहुर तालुक्याच्या पक्ष निरीक्षकपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्ह्याचे लोकनेते, खासदार तथा लोहा–कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. प्रतापरावजी पाटील चिखलीकर व…