वाढदिवसाचा केक नव्हे, माणुसकीचा उत्सव! सेलूकर दांपत्याचा दिखाव्याला फाटा, माणुसकीला वाट; नांदेडमधील आदर्श
दि.१४ नांदेड (प्रतिनिधी) : आजचा समाज झगमगाट, दिखावा आणि खर्चाच्या स्पर्धेत अडकलेला आहे. वाढदिवस म्हणजे हॉटेल, फुगे, फटाके, सोशल मीडियावरील फोटो आणि काही तासांत विसरला जाणारा आनंद हीच सध्याची मानसिकता बनली आहे. अशा काळात नांदेडच्या सेलूकर दांपत्याने घडवलेला प्रसंग हा केवळ एक कौटुंबिक निर्णय नसून, समाजाला आरसा दाखवणारा जिवंत अग्रलेख आहे. ज्या समाजात वृद्धाश्रमांची संख्या…