
बातमी मध्ये तो व्हिडिओ आहे.!दि. १०. बिहार (विशेष प्रतिनिधी) आरजेडी नेते आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पटना पुस्तक मेळ्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ मध्ये तेज प्रताप यादव फोटो काढताना अचानक अशा शब्दांत बोलताना दिसतात की, संपूर्ण क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.व्हिडिओमध्ये तेज प्रताप फोटो क्लिक करणाऱ्या व्यक्तीला थेट म्हणताना दिसत आहेत “अरे खिच ना रें फोटो *****…!”यानंतर बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहत ते म्हणतात “ई सब हमरा स्टाइल बा… हमरा बाबूजी भी एहिने करत रहलें. ई चीजे लोगन के पसंद आवेला.” तेज प्रताप यांची ही टिप्पणी आणि त्यांची बोडी-लँग्वेज पाहून सोशल मीडिया यूजर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नेहमी प्रमाणे मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काही जण त्यांची शैली ‘मनोरंजक’ म्हणतायत, तर काही जण त्यांच्या ‘अनपेक्षित’ बोलण्यावर टीका करताना दिसत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे, तेज प्रताप यादव यांच्याबाबत असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. ते अनेकदा त्यांच्या वर्तणुकीमुळे तसेच अनोख्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहतात.अगदी काही महिन्यांपूर्वी होळीच्या दरम्यान त्यांनी आपल्या अंगरक्षकाला नाचायला सांगितलेला व्हिडिओ ही तुफान व्हायरल झाला होता.परंतु यावेळेस देशाचे भारतीय संविधान हातात घेऊ अशी टिपणी तेज प्रताप यांच्याकडून होणे म्हणजे? ते सुद्धा भारतीय संविधान मानत नाहीत असच अर्थ होतो का असे to व्हिडिओ च्या खाली कंमेंट येत आहेत त्या दर्शवत आहेत.