
दि. ९ जाने. नांदेड (प्रतिनिधी) लोकशाहीत नगरसेवक म्हणजे केवळ निधी वाटणारा प्रतिनिधी नसतो, तर तो प्रभागाचा संरक्षक, मार्गदर्शक आणि संविधानाचा पहारेकरी असतो. आज प्रभाग क्रमांक ४ समोर प्रश्न आहे तो फक्त रस्ते, नाले किंवा दिव्यांचा नाही, तर न्याय, शिक्षण, रोजगार आणि मानवी हक्कांचा आहे. अशा वेळी नागरिकांच्या मनात जो नगरसेवक उभा राहतो, तो केवळ राजकीय चेहरा नसून संविधान समजणारा, मानवाधिकार जाणणारा आणि विकासाची कायदेशीर चौकट ओळखणारा असतो आणि तो चेहरा म्हणजे संघरत्न निवडंगे.

संघरत्न निवडुंगे हे उच्चशिक्षित, मानवाधिकार विषयाची सखोल माहिती असलेले वकील आहेत. त्यामुळे त्यांची विकासाची दृष्टी भावनिक आश्वासनांवर नाही, तर कायद्याच्या चौकटीतून होणाऱ्या ठोस उपायांवर आधारलेली आहे. शिक्षणापासून वंचित राहणारा विद्यार्थी, शासकीय योजनां पासून दूर ठेवला गेलेला युवक, अन्यायाला सामोरा जाणारा सामान्य नागरिक या सर्वांसाठी नगरसेवक म्हणून काय करता येते, हे त्यांना नेमके ठाऊक आहे.

शिक्षण हा विकासाचा पाया आहे, ही बाब त्यांनी केवळ भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कामातून सिद्ध केली आहे. शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह, परीक्षा, रोजगार मार्गदर्शन या सगळ्या टप्प्यांवर त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. उद्या नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे अधिकृत अधिकार असतील, तेव्हा प्रभाग ४ मधील शिक्षणव्यवस्था केवळ सुधारेलच नाही, तर सामाजिक समतेचा आधारस्तंभ बनेल. आर्थिक विकासा बाबत ही संघरत्न निवडुंगे यांची भूमिका स्पष्ट आहे. हक्काधारित विकास. म्हणजेच योजनांचा लाभ कृपेमुळे नाही, तर अधिकारामुळे मिळाला पाहिजे.

झोपडपट्टी पुनर्वसन असो, छोटे व्यावसायिक, महिला बचतगट किंवा बेरोजगार युवक प्रत्येक घटकासाठी कायद्यानुसार न्याय मिळवून देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. राजकीयदृष्ट्या पाहिले, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ही आज स्थैर्य, विकास आणि प्रशासनाशी थेट जोड असलेली शक्ती आहे. या गटाच्या माध्यमातून संघरत्न निवडंगे प्रभाग ४ च्या प्रश्नांना थेट शासन दरबारी पोहोचवू शकतात. विचारांची स्पष्टता, निर्णयांची ताकद आणि कामाची गती हे त्रिसूत्र या नेतृत्वात दिसते.

आज प्रभाग क्रमांक ४ ला गरज आहे ती घोषणाबाज नव्हे, तर कायदा जाणणाऱ्या; शब्दांवर नाही, तर संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नगरसेवकाची. म्हणूनच नागरिकांच्या मनातील नगरसेवक म्हणून संघरत्न निवडंगे हेच योग्य ठरतात. कारण इथे निवडणूक जिंकण्याचा प्रश्न नाही, इथे प्रभाग घडवण्याचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न संघरत्न निवडंगेच सोडवू शकतात असा प्रभागातील मतदारांचा विश्वास बनलेला आहे.