
किनवट, दि. २३ (तालुका प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या अंतर्गत कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे ‘हिवाळी-२०२५’ सत्राच्या परीक्षा उत्साहाच्या वातावरणात सुरळीत आणि शिस्तबद्धरीत्या संपन्न झाल्या. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन गरजांना समर्पित या केंद्राने आयोजित केलेल्या या परीक्षा पारदर्शक आणि विनाअडथळा पार पडल्या.या यशामध्ये विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि परीक्षा संचालक डॉ. हुशारशिंग साबळे यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहकार्य ठरले. विद्यापीठ प्रशासनाच्या विशेष लक्षामुळे सर्व व्यवस्था अचूक रचली गेली होती. उपकेंद्रावर समाजकार्य विभागातील बी.एस.डब्ल्यू. व एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. उपकेंद्र समन्वयक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली प्रक्रिया अंमलात आणली गेली. केंद्र प्रमुख डॉ. नितीन गायकवाड आणि सह-केंद्र प्रमुख डॉ. योगेश अंबुलगेकर यांनी व्यवस्थापनातील जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळली, तर तंत्र सहाय्यक प्रा. श्रीकांत दुधारे यांचे तांत्रिक सहकार्य यशास महत्त्वपूर्ण ठरले. गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व बाजूंनी सतर्कता बाळगण्यात आली होती. शैक्षणिक पारदर्शकता आणि प्रक्रियेची गंभीरता यावर येथील संपूर्ण कर्मचारी-शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी जाणीवपूर्वक ठाम होते.या कार्यात उपकेंद्रातील प्राध्यापक डॉ. प्रवीण खंडागळे, डॉ. प्रमोद राठोड, प्रा. प्रिती देवस्थळे, प्रा. चेतन जाधव, प्रा. श्रीराम पवार तसेच कर्मचारी विठ्ठल हंबर्डे, रमेश जाकुलवार, वर्षाताई, रामभाऊ टेकाम, सुरक्षा रक्षक राजू जाधव, मुरली, सुनील टेकाम यांनी मोलाची मदत केली. आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या केंद्राच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ही परीक्षा प्रक्रिया एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विद्यापीठ वर्तुळातून यशाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.