मुस्लिम महिलेने जयश्री राम म्हटल्यावरच जेवण मिळेल;टाटा रुग्णालयाबाहेर अन्न वाटप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा,

दि.३१ संजय भोकरे (मुंबई प्रतिनिधी);
सोशल मीडियावर व्हिडिओची दखल घेत महाराष्ट्र पोलिसांनी व्हिडिओमध्ये अन्न वाटप करताना दिसणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.
मुंबई शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून, टाटा हॉस्पिटलबाहेर अन्न वाटप करणाऱ्या या व्यक्तीने मुस्लिम महिलेला जेवण दिले नसल्याचा दावा केला जात आहे. दाव्यानुसार, त्या व्यक्तीने सांगितले की, जोपर्यंत ती महिला ‘जय श्री राम’ म्हणत नाही तोपर्यंत तिला जेवण दिले जाणार नाही.

या व्हिडिओची दखल घेत मुंबई पोलिसांनी व्हिडिओ मध्ये अन्न वाटप करताना दिसणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या वृद्धाची ओळख पटली आहे. याप्रकरणी एका प्रवाशाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुढील कारवाईची तयारी सुरू आहे.
हा व्हायरल व्हिडिओ रस्त्यावरून जात असलेल्या कोणीतरी रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यान, रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीचा अन्न वाटप करणाऱ्या वृद्धाशी वाद झाला. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला असे न करण्यास सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

सदरील व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, अन्न वाटप करणाऱ्या व्यक्तीने हिजाब घातलेल्या महिलेला पाहिल्यानंतर लगेचच तिला बाहेर जाण्यास सांगितले. जेव्हा महिलेने त्याच्याकडे पुन्हा जेवण मागितले तेव्हा त्या व्यक्तीने तिला जय श्री राम म्हणण्यास सांगितले. महिलेने हे सांगण्यास नकार दिल्याने त्या व्यक्तीने तिचा पाठलाग करून तेथून पळ काढला.

One thought on “मुस्लिम महिलेने जयश्री राम म्हटल्यावरच जेवण मिळेल;टाटा रुग्णालयाबाहेर अन्न वाटप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top