नांदेड दि: ५ (सतीश वागरे; सहसंपादक)
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हायहोल्टेज लढती पाहायला मिळत आहेत. कुठे भावा-बहिणीत लढत आहे, कुठे काका-पुतणे तर कुठे भावकीत लढत सुरु आहे. सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. कधीकाळी एकत्र असलेले नेतेच या विधानसभेत एकमेकां विरोधात उभे टाकणार आहेत.
नांदेड उत्तर मतदारसंघातून बाळासाहेब/
बालाजी दत्तराव देशमुख तरोडेकर हे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार होते. बाळासाहेब देशमुख हे नांदेड उत्तर मतदारसंघातील वैध उमेदवार झाले असून त्यांना विजेचा खांब निशाणी चिन्ह भेटले होते.

परंतु आज त्यांनी सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे बघून कार्यकर्त्यात संभ्रम दिसून आला. सुरुवातीला त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नांदेड उत्तर विधानसभेच्या उमेदवार सौ. संगीता डक पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिला असल्याच्या प्रेस फोटोग्राफर ने काढलेल्या फोटो नांदेड उत्तर च्या कार्यकर्ते व मतदारांना पाहण्यात आले. या पक्ष प्रवेशावेळी त्यांच्यासोबत माजी दोन नगरसेवक, शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर काही तासानंतर त्यांनी श्री. रामाच्या मदती साठी लक्ष्मण येतो तसे वॉर्ड क्रमांक २ तरोडा चे प्रथम नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी शिंदेसेना गटाचे उमेदवार तसेंच नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश घेतला. बाळासाहेब देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तरोडा येथील प्रथम माजी नगरसेवक होते. त्यांच्या या पक्ष प्रवेशावेळी गोविंदराव देशमुख तरोडेकर, वाडी ग्राम पंचायतचे सदस्य बाळासाहेब पावडे, यांनी उपनेते आ. हेमंत पाटील व शिवसेना उमेदवार आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे बालाजीराव शिंदे कासारखेडकर, बंडू पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे आदी उपस्थित होते.
