दि. १९ नांदेड (प्रतिनिधी)
८७ लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. पूर्णपणे महिलांसाठी व सर्व महिला मतदान अधिकारी असलेले ‘सखी’ मतदान केंद्र मतदारांच्या प्रतिक्षेत सज्ज झाले आहे. गुजराती हायस्कूल वजिराबाद येथे स्थापन करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्राची उत्तम सजावट करण्यात आली आहे. सुंदर फुलापानांच्या अलंकरणासह सेल्फी पोइंट ची मांडणी करण्यात आली आहे. ८७ दक्षिण नांदेडचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खल्लाळ,मनपा उपायुक्त मनिषा नरसाळे प्रशालेचे मुख्याध्यापक रवी सुमठाणकर, प्राथमिक चे मुख्याध्यापक दुर्गादास सापडगांवकर, स्विप कक्षाच्या कविता जोशी, सारिका आचमे शाळेचे पर्यवेक्षक बालाजी हुलकाणे, अनिल सावंत, मेहुल दावडा यांनी सुसज्ज ‘सखी’ मतदान केंद्र तसेच ‘आदर्श’ मतदान केंद्र तयार करण्यासाठी परिश्रम घेतले.
