स्वयंसहायता समूहातील महिला सदस्यांनी घेतली मतदानाची शपथ.

दि. १९ नांदेड (प्रतिनिधी)। दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नांदेड शहरातील विविध स्वयंसहायता समूहाच्या महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधनी शिक्षण संस्था यांचे वतीने लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल गणेश नगर गणेश नगर येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाकरिता नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे चंद्रकांत कदम श्रीयुत प्रवीण मगरे श्री सूर्यवंशी उपस्थित होते. तर स्वीप कक्ष नांदेड तहसील कार्यालय नांदेड येथील सदस्य प्रा. डॉ. घनश्याम येळणे या कार्यक्रमाकरिता मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम येळने सरांनी महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगून मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे हे स्पष्ट केले.

नंतर सहभागी झालेल्या स्वयंसहायता समूहाच्या महिलांना मतदानाची शपथ देण्यात आली.
तसेच महिलांनी स्वाक्षरी करून आम्ही मतदान करणारच अशी ग्वाही दिली. महानगरपालिकेच्या वतीने स्वाक्षरी फलक व सेल्फी पॉईंट येथे लावण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्या सुनंदा मडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top