दि. २८ नांदेड (ग्रामीण प्रतिनिधी)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्र, येथे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत गजानन इंगोले व मेघनाथ खडके यांनी मागील चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मिळावा यासाठी वरिष्ठाकडे मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
अध्ययन कक्षाच्या संचालिका डॉ. शालिनी कदम यांनी जाणीवपूर्वक आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला, असल्याचा आरोप दोन्ही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी केला आहे. आर्थिक पिळवणूक करणाऱ्या संचालक यांच्याविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार करणार असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.
विद्यापीठाच्या कुलसचिव व स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मागील चार महिन्यापासून विद्यापीठाने आमच्याकडून प्रवेश प्रक्रिया याशिवाय अध्ययनाचे काम करून घेतले, कामाचा मोबदला आम्ही मागत होतो. परंतु स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका यांनी जाणीवपूर्वक आम्हाला मानधन देण्यापासून टाळले. त्यामुळे अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे दोन्ही कंत्राटी प्राध्यापकां चे म्हणणे आहे.
तसेंच आमच्या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. केलेल्या कामाचे मानधन मिळावे यासाठी वेळोवेळी कुलगुरू यांना भेटून मागणी केली. याशिवाय आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व्यवस्थापन परिषदेकडे या विषयावर चर्चाही झाली.

तरीही यांनी चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मागणी करूनही न मिळाल्यामुळे संचालकाच्या त्रासाला कंटाळून कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. असे दोन्ही कंत्राटी प्राध्यापक यांचे म्हणणे आहे.
परंतु आजच्या घटनेने विद्यापीठ परिसरात कुलसचिव यांच्या व विद्यापीठ प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची दिवसभर परिसरात दबक्या आवाजात कर्मचारी-अधिकारी यांच्यात चर्चा होती.