दि. १७(महाराष्ट्र, सहसंपादक;उमेश गिरी)
हिंदुत्ववादी संघटनांनी आज दुपारी औरंगाबाद येथील औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यासाठी तीव्र आंदोलन केले या आंदोलनामध्ये विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये नारेबाजी काही तरुणांनी केली असे

म्हटले जात आहे. त्यामुळे नागपूर च्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली असल्याचे आज दुपारी दिसून आले. एका गटाच्या तरुणांनी तुफान दगडफेक केली असल्यामुळे दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले होते. अशा तणावग्रस्त परिस्थितीत पोलिसांनी अश्रू

धुराच्या नळकांड्या फोडल्या क्रेन आणि अनेक वाहनांना जाळाच्या स्वाधीन केले होते. आज दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगाबादची कबर उघडून टाकण्यासाठी आंदोलन केले होते, या आंदोलनात विशिष्ट समाजाच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा काही तरुणांकडून करण्यात आला होता. याविषयी त्यांनी पोलिसांना देखील सांगितल्याची माहिती आहे. मात्र दुपारी हे प्रकरण पोलिसांनी मिटवले मात्र सायंकाळी दोन्ही गट एकमेकांसमोर येऊन उभे टाकले.

सदरील दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे दोन्ही गट परस्परांविरोधी आक्रमक दिसून येत होते. महाल येथील स्थानिक राजकीय नेत्यांकडून 100 च्या वर गाड्या जाळण्याचा आरोप सुद्धा करण्यात येत आहे. पोलिसांकडून मर्यादित बळाचा वापर करत, जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. परंतु ह्या दगडफेकीत अग्निशामक दलाचे जवान सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी घडलेल्या घटनेबद्दल अफवा पसरू नये असे आवाहन खालील व्हिडिओमध्ये केले आहे.