
दि.२४ नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेडच्या आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते आणि उल्हासनगर भागातील रहिवासी प्रा. महेंद्र वामनराव खिल्लारे यांचे आज संध्याकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ४१ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता हिंगोली तालुक्यातील जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या मौजे पळशी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दिवंगत प्रा. महेंद्र खिल्लारे यांच्या पक्षात आई, वडील, भाऊ, बहिणी, पत्नी वंदना, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. नांदेड येथील आंबेडकरवादी मिशन या संस्थेमध्ये ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.