
नांदेड, (प्रतिनिधी)-भीम संदेश कॉलनी श्रावस्ती नगर येथील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त भूमिलेख अधिकारी काशिनाथ मानेजी धुळे यांचे आज संध्याकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. दिवंगत काशिनाथ मानेजी धुळे यांच्या पश्चात एक भाऊ, मुलगा, चार मुली, नातू असा मोठा परिवार आहे. सहशिक्षक भगवान कदम यांचे ते मोठे मामा होते. नांदेड येथे उद्या दि. ३० जून रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.