अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन पाईकराव यांना पितृशोक: सेवानिवृत्त बँक मॅनेजर लक्ष्मणराव विठ्ठलराव पाईकराव यांचे निधन; उद्या नांदेड येथे गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

नांदेड, (प्रतिनिधी)- हर्षनगर भागातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव विठ्ठलराव पाईकराव (वय ७२) यांचे आज सकाळी वर्धापकाळाने निधन झाले. हदगाव तालुक्यातील धानोरा (रुई) येथील ते मूळ रहिवासी होत. दिवंगत लक्ष्मणराव पाईकराव यांच्या पश्चात पत्नी मायावती पाईकराव, तीन मुले, एक मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे. नांदेड येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डेल्टा हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन पाईकराव, अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रशांत पाईकराव, प्रा. राहुल पाईकराव, आणि बालरोग तज्ञ डॉ. प्रज्ञा पाईकराव बनसोड यांचे ते वडील होत. उद्या दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डेल्टा हॉस्पिटल नांदेड येथील निवासस्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून हर्षनगर येथील बौद्ध विहार मार्गे गोवर्धन घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top