दिल्ली स्फोट : राष्ट्र हादरले, देश सुरक्षेवर प्रश्न चिन्ह

दि. १० दिल्ली (प्रतिनिधी) दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटात १३ हून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. राजधानीसारख्या संवेदनशील ठिकाणी झालेला हा हल्ला देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करतो. नागरिकांत भीतीचं वातावरण असून,

या दहशतवादी कारवायांचा मागोवा घेऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.दिल्ली स्फोट आणि जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेले ३०० किलो RDX हे दोन वेगवेगळे प्रसंग असले तरी देशाच्या सुरक्षेतील त्रुटी स्पष्ट करतात. अशा घटना रोखण्यात अपयश आल्यास जनतेचा विश्वास ढासळतो. आता सरकारने केवळ चौकशी नव्हे तर अंमलबजावणीतही कठोरता दाखवणं आवश्यक आहे.निरपराधांचा बळी : एक हृदयद्रावक शोकांतिका या स्फोटात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. घरातून कामावर गेलेले, मुलांना शाळेत सोडून परतणारे, आणि रोजंदारी करणारे लोक… काही क्षणांत राखेत मिसळले. देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात असली तरी त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश शब्दांत मावणारा नाही.उत्तर प्रदेशात हाय अलर्टदिल्ली स्फोटानंतर उत्तर प्रदेशसह शेजारील राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन, मेट्रो, बाजारपेठा आणि सरकारी कार्यालयांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.मास्टरमाइंड कोण?स्फोटामागील सूत्रधार कोण आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या RDXचा या कटाशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. देशविघातक शक्तींना आतून किंवा बाहेरून पाठबळ मिळतंय का, याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे.एकजुटीचा क्षणआघातांच्या काळात राष्ट्र एकदिलाने उभं राहणं हेच सर्वात मोठं उत्तर आहे. भीती नव्हे, तर जागरूकता आणि एकता हीच आपली ताकद आहे. शहिद नागरिकांना खरी श्रद्धांजली म्हणजे सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडणं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top