मालेगावनंतर नांदेडमध्ये शैक्षणिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक केली असून पुढील तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शाळा, पालक, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाज यांनी एकत्र येऊन असे अपराध रोखण्यासाठी कठोर आणि ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

नांदेड, दि. २० ( उपसंपादक;सतीश वागरे ) पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरातील नागरिक, पालकवर्ग आणि शैक्षणिक संस्था थरारून गेले आहेत. ही घटना अक्षरज्ञान पब्लिक स्कूल येथे घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकते. १९ नोव्हेंबरला शाळेतून परतल्यानंतर मुलगी अस्वस्थ दिसत होती. तिच्या पोटात आणि पायात वेदना असल्याचे आईने सांगितले.दुसऱ्या दिवशी कपडे बदलताना आईला काही संशयास्पद डाग दिसले. चौकशी केली असता मुलीने धडधडत्या आवाजात आपल्यावर घडलेली घृणास्पद घटना सांगितली. “वर्गात शिक्षक नसताना आरोपीने बाहेर बोलावले…

”मुलीचे कथानक प्रमाणे “ इंग्रजीच्या तासानंतर वर्गशिक्षक गैरहजर असल्याची संधी साधून, आरोपी शिक्षकाने मुलीला वर्गाबाहेर बोलावले तिला धमकावत मैदानाच्या बाजूला नेले, तेथे तिच्याशी गैरवर्तन केले आणि कोणाला सांगितल्यास “तुला मारतो” अशा शब्दांत धमकी दिली. या माहितीने मुलीची आई आणि कुटुंबीय हादरून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंते यांनी सांगितले की,“घटनेची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. आरोपीच्या चौकशीत महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ”पालकवर्गात भीती, शैक्षणिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या घटनेनंतर शाळेबाहेर पालकांची गर्दी झाली असून मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षेची अभावग्रस्तता शिक्षकांच्या पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी, सीसीटीव्ही देखरेख आणि शाळेतील संवेदनशील भागात असलेली रिक्तता यासारख्या गोष्टींची पुन्हा तपासणी करण्याची मागणी पालकांनी मांडली. मालेगावानंतर नांदेड राज्यभरात संतापाची लाट अलीकडेच नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना राज्यभर चर्चेत होती. त्या घटनेचे पडसाद थंडावण्याआधीच नांदेडमध्येही असेच घडल्याने संतापाची लाट उसळली आहे.स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून अशा घटनांच्या वाढत्या मालिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.जबाबदारी नेमकी कुणाची? नागरिकांचा कळवळा समाज माध्यमांपासून शाळेच्या बाहेरील चर्चांपर्यंत सर्वत्र “जबाबदार कोण?” हा प्रश्न ठळकपणे विचारला जात आहे. शैक्षणिक संस्थांची सुरक्षा व्यवस्था? शिक्षकांची पार्श्वभूमी तपासणी? शाळा प्रशासनाची दुर्लक्ष? पालकांचा सतर्कतेचा अभाव? या सगळ्यांचा सखोल विचार करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नांदेडमधील ही घटना फक्त एका कुटुंबावरचा आघात नाही; तर संपूर्ण समाजव्यवस्थेला जागे करणारी चेतावणी आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top