आदिवासी बांधवांचे ‘दंडार’ लोकनृत्य; पारंपरिक पोशाख व लोकसंस्कृती
दि.२ सम्यक सर्पे (किनवट प्रतिनिधी)आदिवासीबहुल तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या दिवाळी निमित्त होणाऱ्या पारंपरिक ‘दंडार’ या लोकनृत्याने गावागावात आनंदाचे उधाण आले आहे. आजच्या संगणक युगातही आदिवासी समाजाने आपली प्राचीन लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे. दसऱ्यापासून सुरुवात होऊन दिवाळीपर्यंत चालणारे हे ‘दंडार’ लोकनृत्य ते पिढ़ानपिढ्या जोपासत आलेले आहेत. ‘दंडार’ मुळात हे डोंगर दरीत वास्तव्य करणाऱ्या गोंडी बोलीभागातील लोकप्रिय…