बॅनर फाडप्रकरणी दुहेरी कारवाईचा आरोप; रा.यु. काँ. जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
दि. ५ नांदेड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीनगर व फुले मार्केट परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बॅनरची धारदार शस्त्राने तोडफोड केल्याच्या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष बॅनर फाडणाऱ्या आरोपींवर फक्त नोटीस देऊन कारवाई करण्यात आली, तर उलट शांतता राखण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्यावर गुन्हा…