दि.६
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खळबळ उडवून देणारे प्रकाश राज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतात. प्रकाश राज अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे लोकांच्या नजरेत येतात, मात्र यावेळी अभिनेत्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. एका चित्रपट निर्मात्याने प्रकाश राज यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. प्रकाश राज यांच्यावर आरोप करणारी व्यक्ती निर्माते विनोद कुमार आहे, ज्याने अभिनेत्याला न कळवता चित्रपटाचा सेट सोडल्याचा आणि त्यांच्या कॉल्स किंवा मेसेजलाही प्रतिसाद न दिल्याचा आरोप केला आहे.

प्रकाश राज यांनी अलीकडेच X (ट्विटर) वर तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि मुख्यमंत्री एमके स्टॅनिल यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘उपमुख्यमंत्र्यां सोबत… फक्त विचारत आहे.’ विनोद कुमार यांनी हा फोटो पुन्हा शेअर करत प्रकाश राज यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले, ‘तुमच्यासोबत बसलेले इतर तीन सेलिब्रिटी निवडणूक जिंकले, पण तुम्ही केलेली गुंतवणूक गमावली, हा फरक आहे. तुम्ही माझ्या शूटिंग सेटवर 1 कोटी रुपयांचे नुकसान केलंय, आम्हाला न सांगता सेटवरून गायब झालात. कारण काय होते? फक्त विचारत आहे. तुम्ही म्हणाला होतात, तुम्ही मला कॉल करणार, पण पण तुम्ही असे काही केले नही.’ या ट्विटला प्रकाश राज यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नसले तरी लोक कमेंट सेक्शनमध्ये आपले मत नक्कीच देत आहेत.