
सहसंपादक; सतीश वागरे
माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली, ही छकड ऐकली की, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतात, कॉम्रेड लोकशाहीर आण्णाभाऊ साठे.

परंतु ही छकड आपल्याच आवाजात प्रसिद्ध केली ती म्हणजे अमर शेख यांनी. अमर शेख यांचे मूळचे नाव म्हणजे महेबूब हुसेन पटेल असे होते तसेच ते महाराष्ट्रातील नामवंत शाहीर होते.

त्यांच्या आई चे नाव मुनेर बी असे होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील गरिब मुस्लिम कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलाला नैसर्गिक पहाडी आवाजाची देणगीच होती व मराठी लोक गीताचा समृद्ध वारसा आई कडून लाभला होता. .शाहिराच्या राजकीय जीवनाची सुरुवात बार्शी येथूनच झाली, सुरुवातीला अमर शेख हे राजन मिल गिरणी मध्ये कामगार होते.

इपटा नावाची शाखा त्या मिल मध्ये होती आणी पुढे गेट मीटिंग, सभा,आंदोलने, धरणे हे पाहून ते डाव्या विचार सरणीला पाहून ते स्वतः प्रभावित होत त्यांना ह्या विचाराची आवड निर्माण झाली. कॉम्रेड रघुनाथ कराडकर ह्या डाव्या विचारसरणीच्या कमिनिस्ट नेत्याच्या मार्गदर्शना खाली ते लोकांना संघटित करू लागले. त्यानंतर ते पुढे कॉमिनिस्ट पक्षासोबत जोडले गेले आणी बार्शी येथून शेतसारावाढी विरुद्ध अखिल भारतीय किसन सभेच्या नेतृत्व खाली २५ हजाराचा मोर्चा काढला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन ह्यात त्यांचा सक्रिया सहभाग होता.

अमर शेख ह्यांनी लोक कलेच्या माध्यमातून लोकांना जागृतकरण्यासाठी चे वृ स्वीकारले होते. त्यांच्या लेखणीने मुंबई तील गिरणी कामगार लढा असो वा संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन असो त्यांच्या लेखणीने समाजाला जागले केले होते. पोवाडे, गिते, लोकांनाट्य, लोकागीत, लिहून लोकांमध्ये विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते फक्त कवीच नव्हते, तर जनमाणसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. इपटा ह्या डाव्या विचार सरणीच्या माधतामातून चालत असलेले सरकार मधील संस्कृतिक माध्यमाची प्रेरणा घेत लाल भावटा ह्या पथकाची सुरुवात केली होती.

अमर शेख ह्याची कविता लोकांच्या मनात रुजली होती. सामान्याच्या उत्कर्शासाठी त्यांनी प्रतिभा वेचली. मार्क्स विचारावर विश्वास ठेऊन, मार्क्सदावर संपूर्ण विश्वास ठेवत त्यांनी आयुष्यभर भारतीय कॉम्युनिस्ट पक्षा सोबत अजन्म जीवन भर राहिले. अश्या शाहीरास आजच्या दिनी खूप खूप अभिवादन
Shahir #AmarShaikh #Maharashtra