साताऱ्याच्या रणांगणात ‘बिग बॉस’ नव्हे, तर हट्टाचा खेळाडू ठसठशीतपणे उभा! ६८ मतांपासून २,७७२ मतांपर्यंतचा संघर्ष! नगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता अधोरेखित केली असली, तरी या निकालात एक नाव वेगळ्या अर्थाने चर्चेत आलं, अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले.

नांदेड दि. २२ डिसेंबर २५ (विशेष प्रतिनिधी;) अभिजीत बिचुकलेंची कामगिरी प्रचंड सुधारली; होमग्राऊंडवर मोठी मुसंडी, यंदा घसघशीत मतं घेत थेट…नगरपंचायतीच्या निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. साताऱ्यात अपक्ष लढलेल्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळवत चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावले.सातारा: राज्यातील नगरपंचायत , नगरपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपनं अव्वल स्थान पटकावलं. २८८ पैकी १२० नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ ठिकाणी यश मिळालं आहे. विरोधी पक्षांचं पुन्हा एकदा पानीपत झालं आहे. त्यांनी विधानसभेतील कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. तर साताऱ्यात अपक्ष लढलेल्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भरघोस मतं घेतली आहेत.विधानसभेला अभिजीत बिचुकले बारामती आणि सातारा-जावळी अशा दोन मतदारसंघांमधून लढले होते. बारामतीत बिचुकले यांना केवळ ६८ मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. सातारा-जावळी मतदारसंघात बिचुकले यांनी ५२९ मतं मिळाली. पण आता बिचुकले यांची कामगिरी आधीपेक्षा सुधारली आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक अपक्ष लढणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना २ हजार ७७२ मतं मिळाली. ते अपक्ष उमेदवारांमध्ये दुसऱ्या स्थानी राहिले. तर एकूण उमेदवारांचा विचार केल्यास चौथ्या क्रमांकावर राहिले. तिसऱ्या क्रमांकावरील शरद काटकर यांना ३९०० मतं मिळाली.विधानसभेला बिचुकले यांना ६०० मतांच्या पुढे जाता आलं नव्हतं. पण सातारा नगरपालिकेत त्यांनी अडीच हजारांहून अधिक मतं घेत थेट चौथा क्रमांक पटकावला. या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते ४२ हजार ३२ मतांनी विजयी झाले. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची ताकद मोहिते यांच्या मागे उभी केली होती. दोन राजे पाठिशी असल्यानं मोहिते यांच्यासाठी लढत सोपी झाली. सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अमोल उदयसिंह मोहिते यांना ५७ हजार ५८७ मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना केवळ १५ हजार ५५५ मतं मिळाली. भाजपच्या अमोल मोहिते यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी करत ४२ हजार ३२ मतांनी विजय मिळवला. अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. पण आताही त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे