नांदेड जिल्हतातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचा दर्शन तर झालंच आहे परंतु अनेक गाई वासरांची शिकार सुद्धा बिबट्याने केल्याच्या बातम्या जिल्हाभर पसरल्या होत्या. “जुन्नर आणि राज्यातील अनेक भागात बिबट्यांच्या भीतीनं लोकांचं जगणं कठीण झालंय. शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भीतीत आहे. सरकारने तातडीने ठोस धोरण आणावं, ” असा त्यांचा ठाम आग्रह होता.

दि.१० नागपूर ( उपसंपादक ;सतीश वागरे) —- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी ग्रामीण भागात भीतीचे सावट गडद होत चालले आहे. शेतीकाम, जनावरांसह बाहेर जाणं, रात्री तर घराबाहेर पाऊल टाकणंसुद्धा धोकादायक बनलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या अनेक घटनांनी ग्रामीण जनजीवन हादरून गेलं असून, लोकांच्या चेहऱ्यावर सतत भीतीचा सावट दिसू लागलंय. या गंभीर परिस्थितीकडं सरकारचं लक्ष वेधण्या साठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अनोखा मार्ग अवलंबला. थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात प्रवेश करत त्यांनी राज्यभरात वाढलेल्या बिबट्या-मानव संघर्षाचा मुद्दा कडाडून मांडला. त्यांच्या या अनोख्या एन्ट्रीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष तात्काळ जुन्नर व इतर प्रभावित भागांकडे वळले. सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा उजेडातही बिबट्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. तसेच बिबट्याचे दर्शन सुद्धा दिवसाढवळ्या शेत जमिनीमध्येतसेच बिबट्याचे दर्शन सुद्धा दिवसाढवळ्या शेत शिवारामध्ये दिसून येत आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांवर, जनावरांवर आणि लहान मुलांवर हल्ल्यांची प्रकरणं वारंवार समोर येत आहेत. अनेक कुटुंबे रात्री झोपताना घराबाहेर न फिरण्याची सूचना देत आहेत, तर काही गावांनी संध्याकाळ नंतर बाहेर जाण्यावर मर्यादा घातल्या आहेत. काही ठिकाणी तर शेतीच उजाड पडली आहे. लोकं शेतात जाण्यास धजावत नाहीत. कदाचित म्हणूनच आमदार सोनवणे बिबट्याच्या वेशात आज येऊन बिबट्याचा मुद्दा राज्यभराच्या दारात मांडण्याचा प्रयत्न त्यांनी करताना दिसून आले आहेत.विधानभवनात बिबट्याच्या वेशातील आमदार सोनवणेंची एन्ट्री पाहून सर्वच सदस्य आणि अधिकाऱ्यांना क्षणभर धक्का बसला. परंतु लगेचच त्यामागची वेदना समोर आली. नांदेड जिल्हतातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचा दर्शन तर झालंच आहे परंतु अनेक गाई वासरांची शिकार सुद्धा बिबट्याने केल्याच्या बातम्या जिल्हाभर पसरल्या होत्या. “जुन्नर आणि राज्यातील अनेक भागात बिबट्यांच्या भीतीनं लोकांचं जगणं कठीण झालंय. शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भीतीत आहे. सरकारने तातडीने ठोस धोरण आणावं, ” असा त्यांचा ठाम आग्रह होता. “बिबट्याच्या सावटात जगणं म्हणजे रोजचा जीवाचा आकांत” अशी ग्रामीण जनतेची हळहळ. पशुधनाचं प्रचंड नुकसान होत असून अनेक कुटुंबांचं आर्थिक चक्र विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. जंगल आणि मानवी वस्त्यांच्या सीमा-रेषा धूसर होत असल्याने संघर्ष अनिवार्य बनत चाललंय.तर काही भागात बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या अपुरी राहत आहे.तज्ज्ञांच्या मते, वनक्षेत्र कमी होणे, अन्नसाखळी बिघडणे आणि अवैध शिकार यामुळे बिबट्या मानववस्तीत येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सरकारने जलद प्रतिसाद पथकं, वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वसन, संवेदनशील ठिकाणी संरक्षण भिंती, आणि लोकजागृती मोहीम यासारखी तातडीची पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज बिबट्या “जंगलाचा नव्हे तर गावाचा राजा” बनल्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे. जनतेत भीती आहे, शेतात अडचणी आहेत, आणि पशुधनाचं प्रचंड नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशात विधानभवन गाठत राज्याला एक स्पष्ट संदेश दिला कीं, “आता पुरे… लोकांच्या जीवाची भीती कमी करण्यासाठी सरकारने तातडीची आणि ठोस कारवाई करावी” ही परिस्थिती नक्कीच राज्याच्या संवेदनशीलतेची आणि धोरणात्मक कृतीची मागणी करते.