डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक समता सप्ताह व फुले, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड: दि. ८ (ग्रामीण प्रतिनिधी)
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
करण्यात आलेल्या महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी डी पवार ,जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकूलसचिव डॉ. मेघशाम साळुंखे यांची उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आध्यासन व अभ्यास केंद्र तसेच प्राध्यापक, अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अनुपम सोनाळे हे असून कार्याध्यक्ष प्रकाश तारू तर सचिव पदी सुरेश वाठोरे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली होती.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र
शासनाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल भारतातील आंबेडकर सामाजिक सप्ताह राबविण्यात येत आहे. याचे उद्घाटन आज कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले होते. या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ एप्रिल रोजी फुले आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ज्येष्ठ विधीतज्ञ एड. जयमंगल धनराज व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान सिनेट सभागृहात होणार आहे. होणार आहे. द्वितीय सत्रात दुपारी तीन वाजता पुणे येथील प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आदिनाथ इंगोले (नांदेड) डॉ. मुकुंद राजपंखे (आंबेजोगाई) डॉ. विकास कदम (नांदेड) डॉ. अक्षय जाधव (छत्रपती संभाजीनगर) हे कवी सहभागी होणार आहेत. माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा प्रसिद्ध कवी डॉ. राजेंद्र गोणारकर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संचलन करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी ,डॉ. रमेश ढगे डॉ. अविनाश कदम ,डॉ. संतोष देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


तर दिनांक १२ रोजी विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर सकाळी 11 वाजता डॉ. उषा सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी डॉ. अर्चना साबळे डॉ. अनुराधा पती यांची विशेष उपस्थित राहणार आहे. तर द्वितीय सत्रात दुपारी साडेबारा वाजता सिनेट सभागृहात भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता याच सभागृहात प्रवीण खाडे व संच (मुंबई)यांच्या शाहिरी जलसा जागर समतेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रात 18 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात विद्यापीठ परिसर आणि व महाविद्यातील सर्व विद्यार्थी यात सहभाग नोंदवणार आहेत.
तर दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सामाजिक समता सप्ताह समारोप कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
दिनांक २१ एप्रिल रोजी फुले, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे.

या समारोपीय कार्यक्रमाला प्रसिद्ध विचारवंत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात होणाऱ्या विशेष व्याख्यानास कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त जयंती महोत्सव समारोप संपन्न होईल. या जयंती महोत्सवास डॉ. रवी एन. सरोदे, डॉ. राजेंद्र गोणारकर ,काळबा हणवते, डॉ. राजपालसिंह चिखलीकर ,डॉ. हर्षवर्धन दवणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून हा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करण्यासाठी डॉ. प्रशांत घोडवार्डीकर , संदीप जाधव डॉ.नितीन गायकवाड, डॉ. नारायण गोरे, संभा कांबळे ,संदीप एडके, स्वप्निल नरबाग, प्रदीप बिडला, सतीश वागरे,विवेक भोसले, संविधान दुगाणे, एड. भीमराव सूर्यवंशी ,राजनाथ पवार ,ऋतुराज बुक्तरे, तेजस्विनी कांबळे, मनोहर सोनकांबळे, जयवर्धन गच्चे,जयवंत आठवले, विशाल कंधारकर आदी परिश्रम घेत आहेत. तरी या जागृती २०२५ संयुक्त जयंती महोत्सव सर्वांनी आपला सहभाग ग नोंदवावा असे आवाहन डॉ. पी. विठ्ठल , अनुपम सोनाळे यासह संयुक्त जयंती महोत्सव समितीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top