
“एपस्टीन फाइल्स” हा असा पारंपरिक पुस्तक नावे नसलेला संग्रह नाही, तर जेफ्री एपस्टीन विरुद्ध चालू असलेल्या गुन्हेगारी तपासातील विविध दस्तऐवजांचा एक मोठा डेटा सेट आहे. यात समाविष्ट आहेत, कोर्ट रेकॉर्डस् आणि खटल्यातील पुरावे, फ्लाइट लॉग्स, एपस्टीनच्या खासगी विमानांचे प्रवासी नावे, संपर्क पुस्तिका,ब्लॅक बुक, काही ईमेल्स, कॉल रेकॉर्डस् व इतर ई-डॉक्युमेंट्स, पीडितांचे तक्रारी, या गोष्टी एकत्र “एपस्टीन फाइल्स” म्हणून ओळखल्या जातात, परंतु हे एक सूत्रबद्ध “गुप्त यादी” नाही जे लोकांना आरोपी म्हणून सिद्ध करत असेल. परंतु बदनामी ला नाव नसतं, आणि सामान्य माणसाला भीती कशाची असती तर ती असते एका बदनामीची. आता आपण पुढे समजून घेऊ की, एपस्टीन प्रकरणाचा नेमका कालक्रम काय होता तर २००६ या वर्षात एपस्टीनवर पहिल्यांदा राज्यस्तरावर लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाला आणि त्यानंतर २००८ मध्ये तो लहान मुलींच्या वैश्य व्यवसायात दोषी ठरला होता. त्यानंतर बरेच वर्षानंतर २०१९ मध्ये आत्महत्या केली, असे न्यायालयामध्ये नोंदवले असले तरी त्याचा गुन्हेगारी आरोपी म्हणून तुरुंगात मृत्यू झाला होता. २०२५ मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसने एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट पास केला व न्यायालयीन दस्तावेज प्रकाशित करण्यास मंजूर केला. प्रकाशित, विश्वसनीय पुराव्यात सध्या भारतातील कोणत्याही राष्ट्रीय नेते, उद्योगपती किंवा सरकारी अधिकाऱ्याचे नावे “एपस्टीन फाइल्स” मध्ये अधिकृतपणे दाखल झाले असल्याचा कोणताही विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही.एपस्टीन फाइल्स हे प्रामुख्याने न्यायालयीन पुरावे, फ्लाइट लॉग्स आणि संपर्क दस्तऐवज आहेत. परंतु कुठलंही नाव सांगतांना ते सुसंगत, सार्वत्रिक-विश्वासार्ह दस्तऐवजावर आधारित आहे का हे तपासावे लागेल. भारताशी कोणताही निश्चित संबंध आजपर्यंत अधिकृत पुराव्यांवर आधारित नाही.