
दि. ३० नांदेड; –_—- (उपसंपादक ;सतीश वागरे): —- – — नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये नागरिकांचा सूर एकवटलेला दिसून येत आहे. “आम्हाला आश्वासनांचा नव्हे, तर काम करून दाखवलेला नगरसेवक हवा आहे,” असा ठाम विश्वास नागरिकांनी माजी महापौर व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ. शिला किशोर भवरे यांच्या कार्यावर व्यक्त केला आहे. प्रभागातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटकां कडून “विकासाची चावी पुन्हा अनुभवी हातातच द्यावी,” अशी स्पष्ट भूमिका घेतली जात असून सौ. भवरे यांची उमेदवारी ही जनतेच्या अपेक्षा आणि विश्वासाचे प्रतीक ठरत आहे. अनुभव, विकास आणि विश्वास यांची त्रिसूत्री सन २००७ ते २०१२ या काळात नगरसेविका म्हणून तसेच २०१६ मध्ये नांदेड महानगरपालिके च्या महापौरपदा ची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना सौ. शिला किशोर भवरे यांनी प्रशासनावर पकड, अभ्यासपूर्ण निर्णय आणि लोकाभिमुख कामांची छाप उमटवली. “केवळ बोलघेवडे नेतृत्व नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारा नगरसेवक” अशी त्यांची ओळख प्रभागात रुजलेली आहे. प्रभागाचा चेहरामोहरा बदलणारी ठोस कामगिरी सौ. भवरे यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची स्पष्ट दिशा मिळाली. याच विकासाचा भाग म्हणून पावडेवाडी नाका येथे छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य पुतळा, आय.टी.आय. चौकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासह सुशोभीकरण, पंचशील ते शेतकरी चौक या मुख्य रस्त्याचा विकास, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, या कामांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर झाल्याचे मतदार उघडपणे सांगत आहेत. मतदारांचा स्पष्ट आणि ठाम संदेशच असा आहे कीं,“नवीन चेहऱ्यांचे प्रयोग नकोत, आम्हाला काम करून दाखवलेला नगरसेवकच हवा आहे,” अशी भावना प्रभागात सर्वत्र व्यक्त होत आहे. सौ. भवरे यांनी सर्व समाजघटकांशी संवाद ठेवत समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा कायम राखल्यामुळेच आज त्यांच्याविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याचे नागरिक सांगतात. विकासाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला आहे. “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी अहोरात्र सेवेत तत्पर आहे. मागील कामांचा अनुभव आणि नव्या संकल्पनांच्या जोरावर प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद माझ्यात आहे,” असा विश्वास सौ. शिला किशोर भवरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रकाशक जनार्दन यशवंतराव वाकोडीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी सौ. भवरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.एकूणच प्रभाग क्रमांक ६ मध्ये ‘काम करणारा, अनुभव संपन्न आणि विश्वासार्ह नगरसेवक हाच हवा’ असा मतदारांचा ठाम अट्टाहास स्पष्टपणे दिसून येत आहे.