आधुनिक भारताचे शिल्पकार संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण कायम राहावे, या उद्देशाने डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा व सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळा दि १८ मे रोजी गोदमगाव (ता. नायगाव खै) जि नांदेड येथे सोहळ्याचे आयोजन शिवाजी महाराज स्मारक समिती, क्रां. बिरसा मुंडा जयंती मंडळ, अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ, भीम जयंती मंडळ व डॉ. बी.आर. आंबेडकर क्रिडा संघ, गोदमगांव यांनी केले आहे. हा सोहळा हस्ते सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर, अध्यक्ष रिपब्लीकन सेना तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड राहणार आहेत.

या सोहळ्यात प्रमुख अतिथी जिल्ह्याचे खा.प्रा.रविंद्र वसंतराव पा. चव्हाण, राज्यसभा सदस्य खा.अजित गोपछडे, आ. संजय बनसोडे, आ. राजेश पवार, माजी खासदार भास्करराव पा. खतगांवकर आ. प्रतापराव पा. चिखलीकर, राष्ट्रीय विद्यार्थी नेते डॉ हर्षवर्धन दवणे (राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट & युथ फ्रंट), वंचित बहुजन आघाडीचे नेते फारूख अहमद, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, संस्थापक, युवा पॅथर, नांदेड चे राहुल प्रधान, विठ्ठल गायकवाड महानगर अध्यक्ष, वं. ब. आ. नांदेड दक्षिण,माधवदादा जमदाडे महाराष्ट्र राज्य सचिव, रि.प.से., उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितीत पोलीस उपाधीक्षक किरणकुमार पोपळघट, स्वप्नील नरबाग (अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकर युवा मंच, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारखड, रि.प.से जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, ज्योतिबा वाघमारे,तालुकाध्यक्ष रि.प.से, शाम निलंगेकर, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. इरंवत पल्लेवाड, सुरेश अंबुलगेकर मा.कृ.सं. मनेरवारलू संघटना, अध्यक्ष, शिवराज पा. होटाळकर मा. जिल्हा परिषद सदस्य, मा. सभापती संजय बेळगे,प्रा. सुरेश रावणगांवकर संजालक, रावणगांवकर केमिस्ट्री जनासेस, संघर्ष साळवे अध्यक्ष, शिवार फाऊंडेशन छ. संभाजीनगर, प्रा. सिध्दांत विश्वनाथ दिग्रसकर, ग्राफिक्स डिझाईनर शुभम दिग्रसकर सुधाकर सोनटक्के, साहेबराव सोनकांबळे, कृष्णा शिंदे गडगेकर शिल्पकार, हे उपस्थितीत राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आहे.
लोकार्पण सोहळ्या निमित्त सायंकाळी ठिक ८ वाजता “भिमाच्या मुळं पोरगं माझं घेऊन फिरतोय सफारी” फेम मेघानंद जाधव प्रस्तुत “परिवर्तनाचा वादळवारा” हा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. या लोकार्पण सोहळ्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे संयोजन समिती तर्फे अध्यक्ष राजु दिगंबर भद्रे, सचिव दलितराज राघोबा भद्रे, नामदेव रामजी भद्रे, रोहिदास संभाजी भद्रे, दादाराव ग्यानोबा भद्रे, मोहन झरिबा भद्रे, तुळशिराम भुजंगा भद्रे, यांनी आव्हान केले आहे