
.
हदगाव शहरात राष्ट्रवादीचा रणशिंग फुंकला! राम चव्हाण यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती संघटन बळकटी करणाला नवी धार
दि. ५ हदगाव | (विशेष प्रतिनिधी) —————————————-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला गती देत हदगाव शहराध्यक्ष पदी राम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तसेच कंधार-लोहा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मान्यतेने करण्यात आली. नियुक्तीचा अधिकृत कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर व युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून पार पडला. यावेळी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष अभिषेक लुटे, हदगाव तालुकाध्यक्ष निलू पाटील, जिल्हा सचिव प्रवीण घुले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राम चव्हाण हे तळा गाळातील कार्यकर्त्यांशी थेट नाळ जोडणारे, संघटन कौशल्य असलेले नेतृत्व असून त्यांच्या नियुक्तीमुळे हदगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल, असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. ही नियुक्ती येत्या काळात हदगाव शहरातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरेल, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवसंजीवनी देणारी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे