जागा वाटपासारख्या मुद्द्यावरून युती कोसळणे हे दोन्ही पक्षांमधील विश्वासाच्या कमतरतेचे प्रतीक आहे. आता निवडकांसमोर पर्याय मर्यादित झाल्याने नांदेडमधील मतदारांचा निर्णयच भविष्यातील राजकीय दिशा ठरविणार आहे.

दि. २२ नांदेड [ उपसंपादक ;सतीश वागरे ]: जिल्ह्यातील राजकीय भूचाल मोठ्या वेगाने बदलत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील महत्त्वाकांक्षी युती फक्त अकरा दिवसांतच कोसळल्याने राजकीय क्षेत्रात सर्वत्र आश्चर्य आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागा वाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे ही युती अस्तित्वात येण्यापूर्वीच कोसळली आहे.काँग्रेस आणि वंचित यांच्यात युती होणार आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेत येण्यापासून रोखले जाईल, अशी अपेक्षा काही कार्यकर्त्यांमध्ये होती. सर्व साधारण वंचित कार्यकर्त्यांमध्ये सत्तेत भागीदारी मिळण्याचा उत्साह दिसत होता. परंतु, स्थानिक वंचित पदाधिकाऱ्यांनी या युतीला पाठिंबा द्यायला नकार दिल्याने हे स्वप्न भंगले.अधिकृत सूत्रांनुसार, निवडणूक आधी होणाऱ्या जागा वाटपावरूनच दोन्ही पक्षात मतभेद उघड झाले. काँग्रेसने जास्त जागा मिळाव्यात यासाठी हट्ट धरल्याचे आरोप ऐकू येत आहेत. “काँग्रेस पक्षाने अशीच मनमर्जी चालवली, जास्त जागा साठी हट्ट पकडला तर, असच होणार,” असे एका वरिष्ठ नेत्याने टीका केली आहे. काँग्रेसने काही ठिकाणी कमी पणा घेतला तर भाजप सत्तेत येणार नाही, पण काँग्रेसमधील नेते कोणत्या विचाराने निवडणूक लढवत असतात यावरुनच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर आणि अनौपचारिक चर्चांमध्ये, “नांदेड जिल्ह्यातून काँग्रेस सुफडा साफ होनार,” अशी टीका ऐकू येते. “नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पार्टीमध्ये दम राहिला नाही,” अशा टिप्पण्याही केल्या जात आहेत. निवडणुकीच्या वातावरणात ‘काँग्रेस-वंचित सोबत आघाडी करू शकत नाही’ यावरुन सामान्य जनतेत गरमागरम चर्चा सुरू झाल्या आहेत.काही लोक असेही म्हणत आहेत की, ‘नांदेड मधील काँग्रेस व वंचित युती कायम आहे’ अशा पोस्ट टाकून नागरिकांमध्ये जाणून-बुजून गैरसमज पसरवले जात आहेत. अशी बातमी फेक असेल तर बातम्या प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवर केस करावी, अशी मागणीही काही लोक करत आहेत.ही युती तुटल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलले आहे. भाजपला यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांना या निर्णयामुळे राजकीय नुकसान सोसावे लागू शकते. आता पुढील निवडणुकीत कोणता पक्ष कोणत्या ताकदीने उतरेल, यावरुनच नांदेडचे राजकीय भवितव्य ठरेल.अकरा दिवसातच युती तुटल्याने राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जागा वाटपासारख्या मुद्द्यावरून युती कोसळणे हे दोन्ही पक्षांमधील विश्वासाच्या कमतरतेचे प्रतीक आहे. आता निवडकांसमोर पर्याय मर्यादित झाल्याने नांदेडमधील मतदारांचा निर्णयच भविष्यातील राजकीय दिशा ठरविणार आहे.