जयवर्धन भोसीकर यांना ‘न्यायचक्र पुरस्कार’ जाहीर पत्रकारितेतील सामाजिक न्यायाच्या योगदानाचा गौरव

नांदेड, दि. ५ मार्च : (जिल्हा प्रतिनिधी) लोक जनजागृती संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘न्यायचक्र पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार शितळे यांनी भोसीकर यांना पुरस्कार निवडीचे सन्मानपत्र देऊन, कुटुंबियांसह पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.गेली वीस वर्षे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत असलेल्या जयवर्धन भोसीकर यांनी पत्रकारितेतून सातत्याने सामाजिक न्यायाचा पुरस्कार केला आहे. वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा ‘न्यायचक्र गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार येत्या २९ मार्च २०२६ रोजी नांदेड येथील देवकृपा फंक्शन हॉल, पूर्णा रोड येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. लोक जनशक्ती पक्षाचे खासदार अरुण भारती यांच्या हस्ते तथा प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित केला जाईल.जयवर्धन भोसीकर यांच्या या निवडीबद्दल दैनिक माहितीचे संपादक विनायक कामठेकर, सम्यक न्यूज लाइव्हचे विजय निलंगेकर, दैनिक एकजूटचे प्रतिनिधी देशमुख, दैनिक नवभारतचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत गव्हाणे, पब्लिक अॅपचे राहुल साळवे यांच्यासह विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top