दि..२० लातूर (प्रतिनिधी) ………………………………………………… येथील नामांकित महाविद्यालय असलेल्या एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर येथे सन २०१४ ते २०२३ पर्यंतच्या काळात प्राचार्य पदाची विद्यापीठाची मान्यता नसताना देखील अनेक बोगस कामे करून लाखो रुपयांची बिले उचलण्याचे काम प्रा.बस्वराज धरणे यांनी केले असे महाविद्यालीन चौकशी अहवालात निष्पन्न झाले असल्याने त्यांना बडतर्फ केल्याचे पत्र महात्मा बसवेश्वर संस्था, लातूर यांनी दिले आहे.

महाविद्यालय चे रंगकाम,रस्ता काम न करता लाखो रुपये उकळण्याचे काम प्रा.धरणे यांनी केला असल्याचा आरोप करत चौकशी समितीची नियुक्ती केली होती.सदर समितीने सर्व बाबी तपासून भ्रष्टाचार झाल्याचे अहवाल कार्यकारिणी मंडळाकडे दिला. त्यामुळे दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सदरील कार्यकारिणी मंडळाने भ्रष्टाचार प्रकरणी गंभीर दखल घेत प्रा. धरणे यांना महाविद्यालयातून बडतर्फ करण्यात आल्याचे पत्र संस्थेचे सचिव माधवराव हणमंतराव पाटील यांनी दिले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यायचे सोडून, भ्रष्टाचाराचे धडे द्यायचे काम, प्रा. धरणे यांनी केले असल्याची कुजबुज महाविद्यालय परिसर व लातूर जिल्ह्यात सदरील चर्चेचा विषय झाला आहे