लिंगायत गवळी समाजाचे ‘सगर महोत्सव’ उत्साहात संपन्न

दि. २ नांदेड (प्रतिनिधी)
दिवाळीत परंपरागत लिंगायत गवळी समाजाच्या वतीने “सगर महोत्सव” समारंभ ‘यदुकुल’ वजीराबाद हनुमान मंदिर येथे अत्यन्त हर्षाउल्हासात साजरा झाला. या समारंभात हजारों यादव गवळी, लिंगायत गवळी, श्रीकृष्ण गवळी समाज बांधव सहभागी झाले होते.
परंपरेनुसार चौधरी गोकुल बिशनकुमार यादव यांच्या हस्ते सगरची पूजा करून सगर सुरू झाले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट पशु प्रदर्शन व पशुसंवर्धन करीता लिंगायत गवळी समाज बांधवा चे यथोचित सत्कार ही करण्यात आला. या प्रसंगी यादव अहीर मंडळाचे संस्थापक स्व.चौधरी शामलाल यादव पारितोषिक, सुवर्ण पदक व सन्मान-पत्र देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र यादव युवक महासभाचे प्रदेश सचिव व सामाजिक कार्यकर्ते चौधरी गोकुल बिशनकुमार यादव यांनी केले होते. यावेळी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोढारकर,श्री.डोईफोड़े, तसेंच अनेकांनी सदिच्छा भेट दिली.

सगर महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतवर्षीय यादव महासभाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिशनकुमार यादव, माजी नगरसेवक किशोर यादव, माजी नगरसेवक धीरज यादव तसेंच भारतभूषण यादव, गगन यादव, गोपाल यादव, डॉ.कैलाश यादव, प्रभू आप्पा आलमखाने, धोंडीबा परनकार, धोंडीबा कनबाले, नरसू आप्पा आलमखाने, चंद्रकांत जुजाराव, नंदकिशोर लुले, शिवाजी ओसेकर, महेश अष्टेकर, सदाशिव आलमखाने, शिवाजी आलमखाने, गोविंद आलमखाने, बालाजी चौधरी, चंद्रभान बटाऊवाले, संजय यादव, सतीश यादव,राजेश कुलकर्णी, विजय यादव, अजय यादव, स्वराज यादव, ऋषी यादव, मन्नू यादव, देवांश यादव व समाजाचे अनेक गण मान्यवर सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top