दि. ४ नांदेड (प्रतिनिधी) –आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी नियुक्त्या सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने माहुर तालुक्याच्या पक्ष निरीक्षकपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती जिल्ह्याचे लोकनेते, खासदार तथा लोहा–कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. प्रतापरावजी पाटील चिखलीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.इंजि. स्वप्निल इंगळे पाटील हे तरुण, गतिमान व संघटनक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्ष संघटनात विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या असून युवक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.माहुर तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. यानुसार, इच्छुक उमेदवारांच्या अर्जस्वरूप मुलाखती घेऊन आगामी निवडणुकांकरिता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.या नियुक्तीबद्दल तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.