मुलाने-बापाने मिळून केली हत्या; नांदेडतील घटना, पोलिसांनी केले जेरबंद

नांदेड, दि. ३० ऑक्टोबरः (प्रतिनिधी) —— ——- —— — पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी गुन्हे शाखेचे पथक तळ ठोकून तपास करत असताना आरोपी विशाल गणेश दारेवाड व त्याचे वडील गणेश दारेवाड यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

नकुल हा विशालच्या बहिणीस सतत त्रास देत असल्याने दोघांनी मिळून २६ ऑक्टोबरच्या रात्री त्याचा मारहाण करून खून केला व मृतदेह विहिरीत फेकला, अशी माहिती त्यांनी दिली.सविस्तर वृत्त असे की, मौजे कांडली बु. ता. हिमायतनगर येथे मुलीला त्रास देणाऱ्या युवकाचा बाप-लेकाने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मयत नकुल संजय पावडे १७ वर्षे असे असून तो शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. दिवाळी सुटीसाठी तो घरी आला होता.

२६ ऑक्टोबरच्या पहाटेपासून तो बेपत्ता झाल्याने त्याच्या वडिलांनी तामसा पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली होती.दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवटे हे सपोनि खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. गुन्हा केवळ २४ तासांत उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top