नांदेड दक्षिण स्विप कक्षाचा अनोखा उपक्रम; मतदान जनजागृती विविध स्पर्धेतील प्रमाणपत्राचे वितरण संपन्न

दि. १८ नांदेड (प्रतिनिधी) ८७ नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान घोषवाक्य घोषवाक्य, चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पोस्टर रंगवा,रांगोळी व मतदान करण्याच्या आवाहनाचे पत्रलेखन अशा विविध खुल्या स्पर्धांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले होते. या सर्व खुल्या स्पर्धांना अत्यंत भरघोस प्रतिसाद लाभला होता. या सर्व स्पर्धेत एकूण नांदेड दक्षिणसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रातील 166 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमुळे मतदान जनजागृती होण्यास भरीव मदत झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व स्पर्धकांचा 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने सन्मान करुन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वितरण सोहळा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात डॉ सचिन खल्लाळ-निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड, प्रविण पांडे-तहसीलदार नांदेड, नितेशकुमार बोलोलु-नायब तहसीलदार निवडणूक, संजय नागमवाड, पेशकार राजकुमार कोटुरवार,स्वीप सदस्य राजेश कुलकर्णी व संजय भालके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी मतदान जनजागृती घोषवाक्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त आशिष विजयराव कल्याणे,मुगट,ता.मुदखेड, द्वितीय क्रमांक प्राप्त अतुल अशोकराव कुलकर्णी, काबरा नगर,नांदेड व तृतीय पुरस्कार प्राप्त सौ.उज्ज्वला अभयकुमार भावसार-दांडगे,पुंडलीकवाडी,नांदेड यांच्यासह विविध स्पर्धेतील नितिका बेद्रे, सौ.अरुणा विकास लामतूरे,सौ.प्रियदर्शनी सोनवणे,रोहिणी राजेश पोहरे, मतांशा बानो, अंजली पोहरे,पलक शिवाजी बैनवाड,फुरखान अशा यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करुन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ सचिन खल्लाळ यांनी सर्वांचे अभिनंदन करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग घेवून मतदान जनजागृती केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.कुलकर्णी यांनी केले तर आभार विजयकुमार चोथवे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीप सदस्य डॉ घनश्याम येळणे,संजय भालके, राजेश कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, कविता जोशी व सारिका आचमे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top