
नांदेड (प्रतिनिधी):
शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाचे पाणी जार उपलब्ध करून देण्यासाठी “श्री नृसिंह इंडस्ट्रीज” या नवीन उद्योगाचा करण्यात आला.
या उद्योगात २० आणि १० लिटर पाण्याच्या बॉटल्स (जार) तसेच २.५ लिटरच्या पाण्याच्या हंड्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देणे व शुद्ध पाणी पोहोचविणे हा या उद्योगाचा मुख्य हेतू असल्याचे उदयोजक सुमित संजय गाजरे यांनी सांगितले.

या शुभारंभ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतुकराव हंबर्डे (जिल्हाध्यक्ष, भाजप नांदेड दक्षिण) आणि माधवराव मोहनराव पवळे पाटील यांच्याही प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

संपूर्ण गाजरे परिवाराने या उद्योगाच्या माध्यमातून सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
हा शुभारंभ सोहळा रविवार, दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करुणाश्रम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन सौ. छाया संजय गाजरे यांनी केले होते. या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी गाजरे परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या