नांदेडमध्ये राजकीय बॅनरफाड प्रकरण; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून दिरंगाई: युवक काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी

दि. २४, नांदेड :
छत्रपती शिवाजीनगर परिसरात राजकीय तापमान चढवणारी घटना २२ नोव्हेंबरच्या रात्री घडली आहे. रात्री सुमारे ११:३० वाजता फुले मार्केटजवळील आर. एस. ब्रदर्स दुकानाशेजारी लावलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर विधानसभा अध्यक्ष रोहन कांबळे यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा बॅनर एका अनोळखी व्यक्तीकडून फाडण्यात आला. या कृतीमुळे सुमारे ₹३,५००/- चे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

   व्हिडिओ उपलब्ध असतानाही पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह

बॅनरफाड प्रकरणाचा व्हिडिओ उपलब्ध असूनही तातडीची कारवाई न झाल्याने युवक काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तक्रारदाराकडून निवेदन मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने एनसीआर (NCR) दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस फुलारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

यावेळी, घटनेची माहिती मिळताच उत्तर विधानसभा अध्यक्ष रोहन कांबळे आणि जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे हे दोघे थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी दाखल झाले.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे;
पोलीसांनी उलट या दोघांवर आधी गुन्हा नोंदवला, अशी गंभीर आरोपांची नोंद निवेदनात करण्यात आली आहे. बॅनरफाड झालेल्या ठिकाणापासून पोलीस स्टेशनचे अंतर अगदी कमी असतानाही विलंबाने आणि संशयास्पद पद्धतीने कारवाई होत असल्याची टीका युवक काँग्रेसने केली आहे.
घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक, नांदेड यांना निवेदन सादर केले. यात शहरातील शांतता व सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या प्रवृत्तींस आवर घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

—“आमच्या सहकऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरची जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात आली आहे. ही द्वेषपूर्ण आणि निच प्रवृत्तीची कृती असून त्यामुळे शहरातील सामाजीक वातावरण दूषित होऊ शकते. आरोपींची तात्काळ ओळख पटवून अटक करावी व योग्य ती कारवाई करावी.असे ”निवेदनात म्हटले आहे.

राजकीय हालचालींना वेग
या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बॅनरफा
डीसारख्या घटनांमुळे राजकीय वैमनस्य, स्थानिक गटांतील तणाव आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढता प्रभाव यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची दिशा गतीमान केल्याचे सांगितले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top