नवी दिशा, नवा प्रकाश: गणेशनगरच्या विकासाची जबाबदारी एका ‘जिगिरी’ हातात

भाऊ’ आता वार्डाचा सेवक: समाजकार्याच्या ज्योतीने विकासाचा मार्ग प्रकाशित करणारे मयूर कोकरे! ———————————————————— नांदेड, दि. ४. (उपसंपादक: सतीश वागरे) ———— शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सामुदायिक क्षेत्रात एक परिचित आणि आदरणीय नाव म्हणजे मयूर उर्फ महेंद्र कोकरे. बहुतेकांसाठी ते ‘मोठा भाऊ’, अनुभवी मार्गदर्शक आणि अतूट ऊर्जा असलेले जिगीर व्यक्तिमत्त्व आहेत. दशकांभर त्यांनी समाजकार्यातून आपले ओळखपत्र निर्माण केले आहे. आता, या समर्पित सेवेच्या पायावर उभे राहून, ते वार्ड क्रमांक ६ अ (गणेशनगर) प्रभागातून, अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेवर नगरसेवक म्हणून त्यांची अर्धांगिनी सौ. पोर्णिमा महेंद्र उर्फ मयूर कोकरे निवडणूक लढवत आहेत, आणि ‘नवी दिशा, नवा प्रकाश’ या मंत्रासोबत मतदारांच्या विश्वासाचा झेंडा उंचावत आहेत.मयूर कोकरे यांचा सामाजिक जीवनप्रवास हा सेवेच्या विविध आयामांनी समृद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणारी मॅरेथॉन, महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) रक्तदान शिबिर, दुर्गादेवी, अनेक महापुरुषांच्या जयंती सारख्या प्रसंगी अन्नदान सेवा, तसेच विविध जयंती मिरवणुका यांतून त्यांनी सामुदायिक भावना आणि सामाजिक जागृतीचे कार्य केले आहे. या सर्व उपक्रमांनी केवळ कार्यक्रमच साधले नाहीत, तर अनेक युवक-युवतींना सामाजिक कार्याशी जोडले. समाजातील लोकांचा दृष्टिकोन त्यांच्याकडे एक ‘सज्जन, सेवाभावी आणि समाजप्रबोधनकारी व्यक्ती’ असा आहे, हे या सातत्यपूर्ण कार्याचेच फलित आहे. “संघर्ष हा आम्हाला वारसा म्हणून भेटला, त्यामुळे लढ्याचे ते आमच्या रक्तात आहे,” असे मयूर कोकरे म्हणतात. ही लढ्याची भावना केवळ व्यक्तिगत नाही, तर कौटुंबिक वारश्यातून आलेली आहे. बु. दलित मित्र मोहनराव गोडबोले, मागासवर्गीय प्रथम नगराध्यक्ष नांदेड, यांची नात, सौ. पोर्णिमा महेंद्र कोकरे (मयूर कोकरे), ह्या यांच्या कुटुंबातील आहेत. सामाजिक न्याय, विकास आणि सबलिकरणाचा हा वारसा आता मयूर कोकरे यांनी पुढील टप्प्यात नेण्याचा निर्धार केला आहे.’एअर कंडीशनर’ या निवडणूक निशाणीखाली लढणारे मयूर कोकरे यांचे ध्येय स्पष्ट आहे: “नवी दिशा, नवा प्रकाश. माझा मंत्र आहे वार्डाचा विकास.” गणेशनगर प्रभाग ६(अ) मधील रहिवाशांना पायाभूत सुविधा, स्वच्छता, रहदारी, पाणीपुरवठा, प्रकाश योजना इत्यादी मूलभूत गरजांपासून ते शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगारविषयक संधींपर्यंत सर्वतोपरी विकासाची गरज आहे. समाजकार्यातून मिळवलेला प्रत्यक्ष अनुभव, लोकांच्या अडचणी ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता आणि समस्यांचे सोडवणुकीच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न, हेच त्यांचे मुख्य शस्त्र आहे. दि.१५ जानेवारी २०२६, गुरुवारी होणाऱ्या मतदानाचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. एका अभिनव, ऊर्जावान आणि समर्पित नेत्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवून, वार्डाला एक ‘नवा प्रकाश’ देण्याची संधी आहे. मयूर (महेंद्र) कोकरे यांनी सामाजिक क्षेत्रात ज्या हिरीरीने काम केले, तीच निष्ठा आणि ऊर्जा आता वार्ड विकासासाठी अधिकृतपणे झोकून देण्याची वेळ आली आहे. मतदार भाऊ-बहिणींनो, ‘एअर कंडीशनर’ या निशाणीवर मतदान करून, केवळ एका उमेदवारालाच नव्हे, तर समर्पण, सेवाभाव आणि विकासाच्या एका नव्या संकल्पनालाच विजयी करा. प्रचंड बहुमताने त्यांना विजयश्री मिळवून देऊ या, आणि गणेशनगर प्रभागाच्या भवितव्यात ‘नवी दिशा’ दाखवू या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top