
भाजपकडून सरस्वती नरहरी राऊत यांची उमेदवारी; समाजकारणाच्या ठाम भूमिकेने मतदारांमध्ये उत्साह! दि. ३० | नांदेड (उपसंपादक : सतीश वागरे)“नगरसेवक हा सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असतो,” या विचाराला प्रत्यक्ष कृतीतून साकार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती नरहरी राऊत यांनी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधून अनुसूचित जातीच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी स्वीकारली असून, नगरसेवक कसा असावा? हा प्रश्न त्यांनी थेट मतदारांसमोर ठेवला आहे. तरोडा ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून कार्यरत असताना पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच गरजू व वंचित कुटुंबांसाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून सरस्वती राऊत यांनी लोकसेवेचा ठसा उमटवला. त्यांच्या या कार्याचा वारसा पुढे नेत, तरोडा परिसर महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्यांचे पुत्र दीपक उर्फ बाळू नरहरी राऊत नगरसेवक म्हणून निवडून आले. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी उपक्रम, आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींसाठी कायम उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आजही “मी राजकारणात नसले तरी समाजकारणातून जनतेसोबत आहे,” अशी ठाम भूमिका मांडत सरस्वती राऊत यांनी प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या मूलभूत गरजा, न्याय आणि विकास यासाठी सदैव बांधील राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजकारणाला प्राधान्य देत, नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात राजकारण नव्हे, समाजकारण ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सेवा, अनुभव आणि विश्वास या त्रिसूत्रीवर मतदारांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन करत सरस्वती राऊत यांनी प्रभागातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा संकल्प जाहीर केला आहे. महिलांपासून युवकांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून गरजू कुटुंबांपर्यंत सर्वांसाठी काम करणारे, संवाद साधणारे आणि प्रश्न सोडवणारे नेतृत्व देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये यावेळी चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. “नगरसेवक राऊतच असणार” असे उत्तर जनतेने आधीच दिले असून, ही निवडणूक सेवेच्या अनुभवावर आणि विश्वासाच्या नात्यावर लढली जात आहे.