परभणी दि.१० (प्रतिनिधी : सचिन खंडागळे)
परभणी शहरांमध्ये संविधानाच्या प्रतीचा आवमान झाल्यामुळे तनावाचे वातावरण तापले आहे. परभणी शहरामध्ये आंदोलन जाम होऊन नंदिग्राम एक्सप्रेस परभणी मध्ये रोखून ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतीचा अपमान झाल्यामुळे रेल्वे स्टेशन वरती तीव्र आंदोलन केले आहे. परभणीच्या शहरातील रेल्वे स्टेशन वरील रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. घटनास्थळावरती परभणीतील पोलीस प्रशासन दाखल झाले असूनही संविधानवादी युवकांकडून जोरदार घोषणाबाजी होत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सर्व काही ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच परभणी मध्ये आंबेडकरवादी समूहाने दगडफेक केल्याचेही सांगण्यात येत आहे. अनेक वाहनांच्या काचा फुटलेल्या दिसत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे.

संविधान प्रतीचे अपमान झाल्यामुळे परभणी शहरांमध्ये संविधान वादी लोकांच्या आक्रोशामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात एका माथेफिरू ने संविधानाचा अपमान केल्यामुळे परभणी शहरातील संविधानवादी युवकांनी मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस रोखून ठेवली आहे. संविधानाचा अपमान केल्यामुळे संविधान वादी युवक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पोलीस व युवकांमध्ये सातत्याने बाचाबाची होत आहे. परभणी पोलीस प्रशासनाकडून परभणी शहरातील शांतता कशी अबाधित ठेवता येईल यावर पोलीस प्रशासन काम करत आहे.