दि. १३ (नांदेड ग्रामीण प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व सामाजिकशास्त्रे संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने विद्वत्ता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम सेमीनार हॉल, सामाजिक शास्त्रे संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. घनश्याम येळणे
संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल हॆ होते तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. डॉ. यशपाल भिंगे आणि प्रा.मुरारी कुंभारगावे हॆ होते डॉ. यशपाल भिंगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रारंभी जीवनकार्य व महिला सबलीकरण या वर मत मांडले तर प्रा. मुरारी कुंभारगावे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरयांचे राजकीय व प्रशाकीय कौशल्य

तसेच सामाजिक धोरण मार्गदर्शक केले या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. हनुमंत कंधारकर(व्यवस्थापन परिषद सदस्य)मा. शिवाजी चांदणे,(आधिसभा सदस्य) हॆ होते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरवगाथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पत्की मॅडम आणि प्रा. अभिजित वाघमारे यांनी केले.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. विकास खारगे (भा.प्र.से.)मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग आणि श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन हॆ होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. येळणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन म्हणजे भारतीय इतिहासाचा सुवर्ण महोत्सव आहे आणि सामाजिक शास्त्रे

अंतर्गत अभ्यासक्रमांतील विध्यार्थीनी अहिल्यादेवी यांच्या कार्यावर संशोधन करावे असे आव्हान केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. स्मिता नायर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी संकुलातील प्राध्यापक डॉ. प्रमोद लोणारकर, डॉ. नंदकुमार बोधगिरे, डॉ. शालिनी कदम, डॉ. बाबुराव जाधव आणि संकुलातील सर्व कंत्राटी सहा- प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.या वेळी विद्यापीठ परिसरातील अनेक संशोधक विध्यार्थी व समाज बांधव आणि विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.