दि.१ मुबंई: (प्रतिनिधी;संजय भोकरे)
एकनाथ शिंदे यांचे यांचे एक मंत्री रमी खेळण्याच्या नादामध्ये आज आपलं पद गमावून बसले. पत्त्यांचा खेळ पडला शिंदे सेनेच्या मंत्र्याला महागात. मंत्री पदाचा धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर. पूर्व कृषी मंत्राच्या खांद्यावर दुसऱ्या मंत्र्याची जबाबदारी.

विधानसभेमध्ये ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या शिंदे सेनेचे आमदार माणिकराव कोकाटे यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, यापूर्वी सदरील खाते इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांच्याकडे होते.
नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना न्याय देऊ व त्यांच्या पिकाला हमीभाव वाढवून देऊ याची आम्ही पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
तसेच राज्याचे नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषिमंत्र्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांचे आभार मानले आहेत.
“एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे ते म्हणाले.
नामदार कृषिमंत्री भरणे म्हणाले “शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.”“शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.