
प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालायला अजून किती व्हिडिओ लागणार? “पालकमंत्री आंधळे की मुद्दाम डोळेझाक? नांदेड जिल्हाधिकारी आणि नांदेड डेपो प्रशासनाची गंभीर उदासीनता उघडी..! —
दि.२ नांदेड[ उपसंपादक; सतीश वागरे] — — — लातूर–माहूर एसटी बसमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लाजिरवाणी आणि संतापजनक बाजू समोर आली आहे. एका वृद्ध प्रवाशाशी थेट हाणामारी करत कंडक्टरने त्याच्या गालफाडीत चापट मारल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड संतापाची लाट उसळवत आहे.हा केवळ एक अपघात नाही, तर एसटी महामंडळात वृद्धांवरील वाढत्या अरेरावीचा जिवंत पुरावा आहे. वारंवार वृद्ध प्रवाशांशी उद्धट वागणूक, अपमान, दमदाटी आणि थेट हात उचलण्याचे प्रकार सुरू असताना जिल्हा प्रशासन, पालकमंत्री आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत आहेत? पालकमंत्र्यांच्या डोळ्यांत अंजन घालावे लागेल का? या जिल्ह्याचे पालकमंत्री खरोखरच आंधळे झाले आहेत का? की मग प्रशासनातील हलगर्जीपणा मुळे जनतेनेच त्यांना “आंधळे” म्हणायला सुरुवात केली आहे? व्हिडिओच जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का? नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम हा व्हिडिओ करणार का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. नांदेड शहरातील डेपोतून अनेक जिल्ह्यांत बस सेवा चालवली जाते, मात्र शिस्त, संवेदनशीलता आणि प्रवाशांचा सन्मान कुठे हरवला आहे?माहूरगड यात्रेत वृद्धांची संख्या अधिक आहे तरीही अरेरावी का? सध्या माहूरगडावर देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात आहेत. यामध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत चालक-वाहकांकडून अधिक संयम, माणुसकी आणि आदर अपेक्षित असताना उलट अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाणच दिसून येत आहे. कोणीच थांबवणार नाही का? एसटी महामंडळातील ही मनमानी, ही दादागिरी, हा प्रवाशांचा अपमान कोणी थांबवणार आहे का? की मग एखादा वृद्ध गंभीर जखमी झाल्यावर, किंवा जीव गमावल्यानंतरच प्रशासन जागं होणार? आज जनसामान्यातून एकच प्रश्न उभा राहतो आहे, “एसटी बस ही सार्वजनिक सेवा आहे की, सत्तेचा माज असलेल्यांची अरेना?”