
नांदेड दि ८ मार्च (प्रतिनिधी) : भारतीय विद्यापीठ संघ (ए.आय.यू.) आयोजित ३९व्या आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पथक आज चेन्नई येथे रवाना झाले. हा महोत्सव दिनांक १० ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तामिळनाडू मधील चेन्नई येथील सत्यभामा विज्ञान व तंत्रज्ञान संस्था, जीपीआर नगर येथे होत आहे. या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाचे पथक एकूण सहा कलाप्रकारांत आपली कला सादर करणार आहे. पथकातील कलाकार शास्त्रीय गायन (एकल), लोकवाद्यवृंद, आदिवासी दंडार नृत्य, समूह नृत्य (संकल्पना आधारित), एकांकिका तसेच मूकाभिनय या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या या पथकात विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्रशिक्षक, पथक व्यवस्थापक, वादक, साथीदार तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आणि विभागातील कर्मचारी यांचा समावेश आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्र-कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, प्रसिद्धी व संपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी या पथकास शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक रवाना झाले आहे. पथकासोबत मार्गदर्शक म्हणून पथक व्यवस्थापक डॉ. संदीप काळे, डॉ. शिवराज शिंदे, श्री. दिलीप डोंबे, श्री. सिद्धार्थ नागठाणकर, श्री. संदेश हटकर, श्री. संकेत गाडेकर, श्री. संभा कांबळे तसेच वादक साथीदार उपस्थित आहेत. विद्यापीठास या महोत्सवातून यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा वर्षत आहेत.