
नांदेड दि. 10 (तालुका प्रतिनिधी) ———————— भीमनगर, मुदखेड येथील रहिवासी व उपासक साहेबराव नागोराव चौदंते यांचे गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) संध्याकाळी ८:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील लिपिक संजय चौदंते यांचे ते धाकटे बंधू होत. साहेबराव चौदंते यांच्या निधनामुळे चौदंते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) दुपारी ११:०० वाजता मुदखेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.