पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने; अर्ज भरण्यास सुरुवात

दि. ३० सप्टेंबर नांदेड: (जिल्हा प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातील तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील पीएच.डी. संशोधकांसाठी पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेचे आयोजन ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात पेन अँड पेपर पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने दिली आहे.ऑनलाईन एनपीटीईएल-स्वयं पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित संशोधन केंद्रात विहित मुदतीत परीक्षा आवेदनपत्र सादर करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी रु. ३४०/- परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा आवेदनपत्र ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित विद्यापीठ संकुल अथवा संशोधन केंद्र येथे ऑनलाईन शुल्कासह सादर करावे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२६ आहे. तसेच संबंधित संकुले व संशोधन केंद्रांनी परीक्षा आवेदनपत्रे आणि परीक्षा शुल्क १६ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षा विभागाकडे सादर करावीत. पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेसंदर्भातील सर्व संबंधित विद्यार्थी, संशोधकांनी वेळेच्या आत आवेदनपत्र सादर करावीत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top