
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
नांदेड :नर्सी-नायगाव (ता.५) | (विशेष प्रतिनिधी) ———- नर्सी गावात २५ जानेवारीच्या रात्री घडलेली वासरू चोरीची घटना केवळ गुन्हा नव्हता, तर मायेच्या नात्यावर झालेला आघात होता. अखेर या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा उलगडा झाला असून, संबंधित आरोपींना ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली आहे.२५ जानेवारीच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी गावातील एका गोठ्यातून वासरू पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या पिल्लावर आलेलं संकट ओळखून माय गाय थेट चोरट्यांच्या वाहना समोर उभी टाकली. कोणतीही भाषा न कळणारी, पण मायेची ताकद असलेली ती गाय आपल्या वासरासाठी शेवट पर्यंत झुंज देत राहिली. पिल्लाला कैदेतून वाचवण्यासाठी तिने दाखवलेले धैर्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. आईचं ममत्व माणसापुरतंच नसतं, याचा प्रत्यय देणारी ही घटना पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. या घटनेनंतर गावकऱ्यांच्या मनात तीव्र संताप आणि हळहळ निर्माण झाली होती. “आज गाय, उद्या माणूस” अशा भावना लोकांतून व्यक्त होत होत्या.या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. ५ फेब्रुवारी रोजी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.मूक प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, तसेच वासरू चोरी सारख्या घटनांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा ठाम इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.